Vaibhav Sooryavanshi International Debut | वैभव सूर्यवंशीचं आतंरराष्ट्रीय पदार्पण लांबणार ?; वैभवपुढे ‘या’ खेळाडूंचं आव्हान

देशासाठी खेळण्याचं वैभव सूर्यवंशीचं स्वप्न भंगणार?,<br/>आतंरराष्ट्रीय पदार्पणाबाबत सस्पेन्स वाढला

Vaibhav Sooryavanshi International Debut | वैभव सूर्यवंशीचं आतंरराष्ट्रीय पदार्पण लांबणार ?; वैभवपुढे ‘या’ खेळाडूंचं आव्हान

वैभव सूर्यवंशी अगदी कमी वेळात सुपरस्टार झाला. त्याच्या फलंदाजीचे अनेक चाहते बनले. अवघ्या तेराव्या वर्षी त्याला राजस्थान रॉयल्सने 1.1 कोटी देऊन संघात समाविष्ट केलं. त्याने 14 व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलं आणि पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. वैभवने त्याच्या पहिल्या सामान्य 20 चेंडूत 34 धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध 38 चेंडूत 101 धावांची खेळी केली. त्यानंतर वैभवने मागे वळून बघितलं नाही. त्याने यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल आणि जोफ्रा आर्चर यांच्याकडे असलेली 'स्पॉटलाईट' त्याच्याकडे वळवली. वैभव सूर्यवंशीला 'बेबी बॉस' म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्याने आयपीएलशिवाय प्रथमश्रेणी क्रिकेट आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आणि भारतीय 19 वर्षांखालील संघाचा उपकर्णधार होता जो संघ विश्वविजेता ठरला.  या सगळ्यांनंतर त्याला भारतीय संघात समाविष्ट करण्याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत, पण वैभवपुढे काही आव्हाने आहेत. ती आव्हाने कोणती आहेत जाणून घेऊया. 

हेही वाचा – Unknown Story of Frankie | या पदार्थाला फ्रँकी का म्हणतात, त्या मागची रंजक कहाणी ऐकून व्हाल थक्क!

1. प्रथमश्रेणी आणि 'लिस्ट ए'  क्रिकेटचा कमी अनुभव  – 
वैभव सूर्यवंशीने त्याच्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं. त्याने 7 मे 2026 पर्यंत प्रत्येकी 8 'लिस्ट ए' आणि प्रथमश्रेणीचे सामने खेळले आहेत, तर 28 टी-20 सामने खेळले आहेत. 8 सामन्यांवरून एखाद्याला पारखणे आणि त्याच्या भविष्याबद्दल भाष्य कारण अत्यंत कठीण आहे. या 8 सामन्यांत त्याने 207 धावा केल्या ज्यात फक्त एका अर्धशतकाचा समावेश आहे. 'लिस्ट ए' क्रिकेटमध्येदेखील त्याने 8 सामने खेळले यात त्याने 353 धावा केल्या त्यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 190 आहे. हे सर्व सामने त्याने एकतर दुबळ्या संघांबरोबर खेळले आहेत नाही तर उदयोन्मुख खेळाडूंविरुद्ध धावा केल्या आहेत. तो अद्याप मोठ्या आंतरराष्ट्रीय गोलंदाजांना कठीण परिस्थितीत खेळलेला नाही. आयपीएलमध्ये मैदानं ही छोटी असतात आणि खेळपट्टी सपाट म्हणजे फलंदाजीसाठी अनुकूल असतात. अशा परिस्थितीत फलंदाजांना गोलंदाजांपेक्षा मदत मिळते. जेव्हा वैभव बाहेरच्या देशात जिथे गोलंदाजांना मदत असते, मैदाने मोठी असतात, तिथे जर त्याने चांगली कामगिरी. तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार याच्यावर शिक्कामोर्तब होईल. 

2. फलंदाजीतील तांत्रिक त्रुटी आणि भारतीय क्रिकेटचा इतिहास – 
वैभव सूर्यवंशीची जी फलंदाजीची शैली आहे ती टी-२० क्रिकेटसाठी अनुकूल आहे. उंच बॅकलिफ्ट, लेग साईडला मोठे फटके मारणे आणि कमी फूटवर्क आणि 'हॅन्ड-आई कोऑर्डिनेशन'वर  खेळणं हे वैभवच्या फलंदाजीची वैशिष्ट्य आहेत, पण वैभवची ही शैली फक्त टी-20 आणि काही प्रमाणात एकदिवसीय क्रिकेटसाठी अनुकूल ठरते. त्याच्या फलंदाजीतल्या त्रुटी कमी वयात गोलंदाजांना समजल्या तर त्याच्या कारकिर्दीसाठी धोकादायक ठरू शकतात. हे सगळं बाजूला ठेवून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी दिली आणि तिथे तो फेल झाला तर त्याच्या बालमनावर त्याचा परिणाम कसा होणार ? त्यातून तो स्वतःला सावरू शकतो ? त्याच्या आत्मविश्वासावर कसा परिणाम होणार ? या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. वैभवला  संघात घेण्याआधी या गोष्टींचा विचार नक्कीच होणार. या आधी भारताने अनेक युवा खेळाडूंना संघात स्थान दिलं. मात्र, त्यांची कामगिरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजिबात चांगली नव्हती त्यामुळे त्यांना भविष्यात जास्त खेळायची संधीदेखील मिळाली नाही. उदा., मयंक मार्कंडे, शहाबाज अहमद, चेतन साकारिया, राहुल चाहर, सुदीप त्यागी , इत्यादी.

हेही वाचा – IPL TOP 4 Criteria : टॉप-4 मध्ये एन्ट्री हवी असल्यास पुढील सर्व सामने जिंकावे लागतील, आयपीएलमधील संघांचं टेन्शन वाढलं

3. भारतीय क्रिकेटमध्ये फलंदाजीतली स्पर्धा – 
वैभव सूर्यवंशी हा सलामीवीर आहे, त्याशिवाय तो कोणत्या दुसऱ्या क्रमांकावर खेळलेला नाही आहे. आता टी-20 मध्ये संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, साई सुदर्शन  आणि प्रियांश आर्य हे खेळाडू दावेदार आहेत. मध्यक्रमात खेळण्यासाठी यापेक्षा जास्त स्पर्धा आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडूंना टक्कर द्यावी लागेल. त्यामुळे एवढ्या खेळाडूंना बगल देऊन पुढे जाणं वैभव सूर्यवंशीसाठी आणि त्याला संघात सामावून घेणं निवडकर्त्यांसाठीदेखील कठीण ठरेल. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number